श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार!
“मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!”
श्रीराम नगर पुनर्वसन –
आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्रीराम नगर पुनर्वसन येथील संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या पुरणगाव कारीमाती – नवलेवाडी – जलकरगोंदी या मूळ गावी पुनःप्रवेश केला आहे.
सन 2012-13 मध्ये वनविभागाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र पुनर्वसनातील सर्व 16 मागण्या अपूर्णच राहिल्यामुळे, आज सकाळी 11 वाजता संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टर, बैलबंडी व मोटारसायकलींनी मोठ्या रॅलीच्या स्वरूपात स्वगावी परतीचा निर्णय घेतला.
या आंदोलनात सुमारे 700 ते 800 नागरिकांनी सहभाग नोंदविला.
ग्रामस्थांचा ठाम इशारा —
> “जेव्हा पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत,
तेव्हा पर्यंत आम्ही पुनर्वसनात परतणार नाही!
आमचं जगणं-मरणं जंगलाशीच जोडलेलं आहे.”
नवेगाव-नागझिरा टायगर रिझर्व परिसरात जंगली पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांना जीविताचा मोठा धोका संभवतो. या संदर्भात ग्रामस्थांचे स्पष्ट विधान —
> “कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास
जबाबदार प्रशासन व वनविभाग राहील!”
ग्रामस्थ परतल्याने वनविभाग व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
—

