ब्राह्मणी खडकीत “बाळा मीच तुझी आई रे” नाट्यप्रयोग 

करोबार खेल महाराष्ट्र राजनीति

ब्राह्मणी खडकीत “बाळा मीच तुझी आई रे” नाट्यप्रयोग 

ब्राह्मणी खडकी : युगप्रवर्तक नाट्य कला मंडळ, बामणी खडकी यांच्या वतीने तीन अंकी मोफत नाट्यपुष्प “बाळा मीच तुझी आई रे” या नाटकाचा मोफत नाट्यप्रयोग आज (७ डिसेंबर २०२५) रविवार, रात्री ९ वाजता जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या पटांगणावर होणार आहे.

या कार्यक्रमात गावातील दोन मान्यवरांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे.
नेहाल डोये (महावितरण टेक्निशियन) व
तेजस्विनी हेमराज वाढई (BAMS)
यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री. विलास वटी, सरपंच ब्राह्मणी खडकी
उद्घाटक : श्री. ललित डोंगरवार, ठेकेदार रेंगेपार
सह-उद्घाटक : श्री. विकास खोटेले उपसरपंच बामणी खडकी

तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास शिवणकर, माजी सरपंचप्रतिमा ताई कोरे, पंचायत समिती सदस्य दीपाली मेश्राम, तुलसीदास खोटेले. चंद्रकुमार सोनुले. लेकचंद शेंडे. व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

युगप्रवर्तक नाट्य कला मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *