राजगुडा ग्रामपंचायततर्फे दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वितरण व अंगणवाडी केंद्राला गॅस कनेक्विशन चे वितरण उमेद–मावीम अभियानासाठी म्याटिंगचे वाटप
सडक अर्जुनी: ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत पाच टक्के निधीमधून दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेटचे वितरण तसेच पाचही अंगणवाडी केंद्रांला 5 गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.व उमेद अभियान व मावीम अभियान सदस्यांना बसण्यासाठी म्याटिंगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय, राजगुडा येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य सौ. दिपाली मेश्राम होत्या. कार्यक्रमाला सरपंच सौ. सुषमा मरस्कोल्हे, उपसरपंच लेखलाल टेकाम, ग्रामपंचायत अधिकारी टी.आर. जानबंधू, वामन मरस्कुले, भैय्यालाल मडावी, संघपाल वैद्य, लता कळपते, कुंदा पटणे, लिखूताई मडवी, सीमाताई पटणे, जागेश्वर पंचभाई.गोपाल शेडमते तसेच , उमेद अभियानाचे सदस्य, अंगणवाडी कर्मचारी व मावीम संघाचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमांतर्गत एकूण 16 दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील जनतेत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायतने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला.

