जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्तव्यावर असताना शाळेतच शिक्षकाचा मृत्यू
झुरकुटोला येथील जि. प. प्राथमिक शाळेतील घटना; गावासह शिक्षण विभागात शोककळा
सडक अर्जुनी, १३ : पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या झुरकुटोला येथील एक शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नितीन गोस्वामी (वय ३८) यांचा कर्तव्यावर असताना शाळेतच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १३) सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. आकस्मिक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंब, गावकरी, विद्यार्थी आणि शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
झुरकुटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, पटसंख्या १३ आहे. या एक शिक्षकी शाळेत शिक्षक
नितीन गोस्वामी हे आंतरजिल्हा बदलीने आठ महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. त्यांनी शाळेत रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक
प्रगतीकडे विशेष लक्ष दिले. दरम्यान, शनिवारी (ता. १३) सकाळी शाळेत आल्यानंतर पावणेअकराच्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि क्षणात त्यांचा मृत्यू झाला.
*मुले झालीत पोरकी*
# इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत एकूण १३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेल्या शिक्षक नितीन गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष दिले होते. मात्र, काळाने त्यांना अल्पावधीत हिरावून घेतले. त्यांच्या मृत्यूमुळे शाळेतील मुले मात्र पोरकी झाली.
शिक्षक गोस्वामी यांच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरताच शाळा आणि डव्या येथील आरोग्य केंद्रासमोर विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी मोठी गदीं केली होती. विद्यार्थ्यांनी अर्जुना वाट मोकळी करून दिली. असे शिक्षक यापूर्वी आमच्या गावात आलेच नाही,
असे गावकरी म्हणाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंब, गाव व शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शिक्षक नितीन गोस्वामी यांचा मृतदेह त्यांचे मूळ गाव राजेगाव मोरगाव
शिक्षक नितीन गोस्वामी हे
अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. विद्यार्थी व शाळेविषयी त्यांना आपुलकी होती. त्यांच्या जाण्याने एक चांगला शिक्षक गावाने गमावला आहे. *- प्रशांत बालसनवार, सरपंच, पाटेकुर्रा,*
(ता. लाखनी, जि. भंडारा) येथे नेण्यात आले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा (वय साडे तीन वर्षे), एक मुलगी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

