खडकी ग्रामपंचायतीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
सडक अर्जुनी=
खडकी ग्रामपंचायत अंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे पाणी साठवण क्षमता वाढून शेतीसह पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमास शर्मिला चिमनकर (सरपंच, ग्रामपंचायत खडकी), ओमराज दखणे (उपसरपंच), कुमारी विद्या कांबळे (सचिव, ग्रामपंचायत खडकी), सौ. छाया कुलबजे (ग्रामपंचायत सदस्य), प्रमिला कुसराम (ग्रामपंचायत सदस्य), पुरुषोत्तम मेश्राम, वनिता गोटेफोडे, सीमा ब्राह्मणकर, सय्यद (वनरक्षक), दुलेस गोटेफोडे, देवेंद्र मेश्राम आणि प्रकाश वैरागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळते, असे मत व्यक्त केले.

