कोलारगाव–कोसबी परिसरात पट्टेदार वाघाची दहशत!मुख्य रस्त्यावर वावर; शाळकरी मुले व शेतकरी भयभीत — वनविभाग करेल का तातडीची कारवाई?

महाराष्ट्र शिक्षा स्वास्थ्य

कोलारगाव–कोसबी परिसरात पट्टेदार वाघाची दहशत!मुख्य रस्त्यावर वावर; शाळकरी मुले व शेतकरी भयभीत — वनविभाग करेल का तातडीची कारवाई?

सडक अर्जुनी|
कोलारगाव, कोसबी व बक्की मेंडकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू असून, मुख्य दळणवळणाच्या रस्त्यावर वाघ दिसत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत तर शाळकरी मुले जीव मुठीत धरून शाळेत जात आहेत.
एम.एस.ई.बी. पावर हाऊस व पहाडी परिसरात वाघ वारंवार रस्ता ओलांडताना दिसत असून, हा रस्ता कोलारगाव, कोसबी, बक्कीमेंडकी सह पाच गावांचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्याने पायदळ, सायकल, मोटरसायकल तसेच शालेय वाहतूक योजनेअंतर्गत शाळकरी मुलींची ये-जा सुरू असते.
या पार्श्वभूमीवर आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी उपवनरक्षक अधिकारी, गोंदिया यांच्यामार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर सचिन फुंडे, कैलास चूटे, विजय मेश्राम, विनोद मोटघरे, अनिल नाणे, योगराज कुरसुंगे, अरविंद मशराम, घनश्याम करूं, मुकेश ठाकरे, प्रशांत कुरसुंगे , नंदकिशोर गहाणे यांच्यासह कोलारगाव–कोसबी–बक्कीमेंडकी येथील सर्व ग्रामस्थ व शेतकरी यांच्या सह्या आहेत.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सात दिवसांच्या आत वाघाचा बंदोबस्त न झाल्यास किंवा पुन्हा वाघ आढळल्यास, संपूर्ण गावकरी मुख्य रस्त्यावर बसून वनविभागाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करतील.
👉 वनविभाग तातडीने हालचाल करणार का?
👉 कोण घेणार शाळकरी मुलांच्या जीविताची जबाबदारी?
👉 अपघात होण्याची वाट पाहणार की वेळीच कारवाई होणार?
संपूर्ण परिसराचे लक्ष आता वनविभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *