ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाचा कळस!
बाम्हनी (ख) येथील खुल्या जिमची दुरवस्था — नागरिकांनी श्रमदानातून केली साफसफाई
सडक अर्जुनी| प्रतिनिधी :
ग्रामपंचायत बाम्हनी (ख) येथील राखीव जागेवरील खुला जिम ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचरा, घाण व झाडी-झुडपांनी पूर्णपणे वेढला गेला होता. आरोग्यासाठी उभारलेली ही व्यायामशाळा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जणू कचराकुंडी बनली होती.
आज शुक्रवार, दि. 02 जानेवारी 2026 रोजी संतप्त नागरिकांनी पुढाकार घेत श्रमदानातून जिम परिसराची स्वच्छता केली. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनाच कचरा व झाडाझुडपे हटवावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या वेळी श्री. सुखदेवे सर, खूशाल तरोने, प्रदीप मेश्राम, सतीश मेडिकल चे संचालक, लोकेश शाहरे, डॉ. शाहरे यांनि पुढाकार घेत साफ सफाई केली
नियमित स्वच्छता, देखभाल व बसण्याची व्यवस्था न केल्याने युवकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांची होत आहे.
आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष थांबवा — ग्रामपंचायतने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी. परिसरातील जनतेची आहे

