वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न
सडक अर्जुनी=
श्री साईबाबा शेतकरी शिक्षण संस्था, खुर्ची पार/डोंगरगाव द्वारा संचालित वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री खेमराज मीतारामजी देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव श्री वसंतरावजी देशमुख यांनी भूषविले. या सोहळ्यास संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, केंद्रप्रमुख श्रीमती वासनिक मॅडम, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानास सहकार्य करू अशी शपथ सर्व उपस्थित ग्रामस्थांकडून घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांकडून असाक्षर मुक्त गाव शपथ घेण्यात आली. देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली सामूहिक कवायत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली, याचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खेमराज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त, शिक्षणातील परिश्रम, जिद्द व सातत्य यांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य श्री के. के. काशिवार, सर्व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजभिये सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री लंजे सर यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

