तालुका बौद्ध समाज संघातर्फे सौंदड येथे धम्मदीक्षा समारंभ 1 फेब्रुवारी रोजी

करियर महाराष्ट्र स्वास्थ्य

तालुका बौद्ध समाज संघातर्फे सौंदड येथे धम्मदीक्षा समारंभ 1 फेब्रुवारी रोजी

सडक अर्जुनी
तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया च्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता धम्म साधना बुद्ध विहार सौंदड येथील प्रांगणात धम्मदीक्षा समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक धम्मदीक्षा समारंभ प्रसंगी भदंत ज्ञानज्योती महाथेरो व भिकू संघाच्या उपस्थितीत हजारोच्या संख्येने नागरिक धम्मदीक्षा ग्रहण करणार आहेत. धम्मदीक्षा घेणाऱ्या नागरिकांना तालुका बौद्ध समाज संघाच्या वतीने प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा करण्यात येणार आहे.
सकाळी 10.वाजता सडक अर्जुनी येथील संबोधी बुद्ध विहारात भिक्खू संघाचे आगमन, स्वागत व भिक्खू संघास भोजनदान, सकाळी 11 वाजता तालुका बौद्ध समाज संघाद्वारा संचालित पतसंस्था, तालुका बौद्ध समाज संघाचे कार्यालय, ट्रॅक्टर व बौद्ध साहित्य दुकानाचे भिकू संघाच्या हस्ते, शेंडा रोड सडक अर्जुनी येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी 11:30 ते 12:30 दरम्यान सडक अर्जुनी येथून सौंदड येथे धम्म रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सौंदळ येथील धम्म साधना बुद्ध विहारात उपस्थित राहायचे आहे. दुपारी 1. वाजता सुंदर माझे बौद्ध विहार, तालुकास्तरीय उत्कृष्ट बुद्ध विहार स्पर्धेचे बक्षीस वितरण धम्म साधना बुद्ध विहार सौंदड येथे करण्यात येणार आहे. दुपारी 1 .30 ते 3 वाजता धम्मदीक्षा सोहळा तसेच संघ प्रमुख व भिक्खू संघाचे मार्गदर्शन, दुपारी 3.30 वाजता सामूहिक भोजनदान व कार्यक्रमाच्या समारोप करण्यात येणार आहे. धम्मदीक्षा घेण्याकरिता तालुका ,जिल्हा, जात ,धर्म याचे बंधन नाही. मात्र धम्मदीक्षा घेण्याकरिता धम्मदीक्षेचा नोंदणी फार्म भरून घेणे अनिवार्य आहे. या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका बौद्ध समाज संघाचे अध्यक्ष महेंद्र चंद्रिकापुरे, दीक्षा सोहळा समिती प्रमख अशोक कुमार लांजेवार, बौद्ध संस्कार विधी समिती प्रमुख विवेकानंद ऐरावत, संविधान जागृती व शिक्षण समिती प्रमुख ठाणेराव वैद्य, तालुका बौद्ध समाज संघाचे पदाधिकारी, तालुका बौद्ध समाज संघ मार्गदर्शक मंडळाचे पदाधिकारी, व तालुका बौद्ध समाज संघाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *