सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा साठी निवड !

करियर महाराष्ट्र शिक्षा स्वास्थ्य

सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा करिता निवड 
सडक अर्जुनी :
इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत सडक अर्जुनी तालुक्याने इतिहास घडवला आहे. येथील होतकरू विद्यार्थी श्री. रमण विश्वनाथ सोडगिर यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत स्टेट लेवल परीशा पास करून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे या नेत्रदीपक यशाच्या जोरावर रमण यांची नॅशनल लेव्हल परीक्षेसाठी निवड झाली आहे.
रमण हे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, जांभडी येथे शिक्षण घेत असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण सडक अर्जुनी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल रमण यांचे आई-वडील, शिक्षकवृंद व मार्गदर्शकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. नॅशनल लेव्हलमध्येही रमण राज्य व गोंदिया जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.
रमण यांना वर्गशिक्षिका कु. कुंडगिर मॅडम, चांदेवर सर, रोहित सर तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर डोंगरावर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी
मुख्याध्यापक किशोर डोंगरावर
“ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही प्रकारे मागे नाहीत. रमण याने राज्यातून राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड होणे ही आमच्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.”

शिक्षिका कु. कुंडगिर मॅडम
“प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा. विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांच्या सामूहिक मेहनतीमुळे आज जिल्हा परिषद शाळा जांभडीचे नाव लौकिक झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *