पुतळी नराठीटोला येथे तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट पुतळी (नराठीटोला),

अपराध खेल मनोरंजन महाराष्ट्र

पुतळी नराठीटोला येथे तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट
पुतळी (नराठीटोला),

सडक अर्जुनी :
जय किसान पट समिती, पुतळी (नराठीटोला, सहाकेपार) यांच्या सौजन्याने दिनांक ९, १० व ११ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. या शंकरपटासाठी परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक व भरघोस बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम बक्षीस ₹४१,०००, द्वितीय ₹३१,०००, तृतीय ₹२१,०००, तर चतुर्थ ₹१५,००० व पाचवे ₹१३,००० रुपये ठेवण्यात आले आहेत. तसेच दहाव्या क्रमांकापर्यंत तसेच पुढील सर्व विजयी बैलजोडींना टप्प्याटप्प्याने बक्षिसे देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. राजकुमार बडोले (आमदार, मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र) यांच्या हस्ते होणार असून, सह-उद्घाटक म्हणून अल्लाउद्दीन राजानी (पंचायत समिती सदस्य) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. चंद्रकला ताई डोंगरवार (जिल्हा परिषद सदस्य) असतील.
झेंडा व दीपप्रज्वलन सुगत दादा चंद्रिकापुरे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी मिलन राऊत (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांच्यासह जय किसान पट समितीचे पदाधिकारी राजेंद्र राऊत, रविंद्र कापगते, दिगंबर कोहळे, शांतीलाल कापगते, संजय वरकडे, विकास कुंभरे, रामदास राऊत, श्रावण कोहडे, धरमलाल मांढरे, संतोष उईके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा तीन दिवसीय शंकरपट यशस्वी करण्यासाठी परिसरातील सर्व पटप्रेमी व बैलजोडी मालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जय किसान पट समिती, पुतळी (नराठीटोला, सहाकेपार) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *