हर हर महादेवच्या गजरात आंबेझरी गायमुख देवस्थान दुमदुमणार महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन

करियर महाराष्ट्र विदेश शिक्षा

हर हर महादेवच्या गजरात आंबेझरी गायमुख देवस्थान दुमदुमणार

महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन

 सडक अर्जुनी

आंबेझरी गायमुख देवस्थान समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तांच्या उपस्थितीत देवस्थान परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमणार असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ज्योत प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी हरिपाठ, महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी आरती, दुपारी गोपाळकाला व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम मा. वसंतजी लांजेवार (EVLE कॉन्ट्रॅक्टर, सडक अर्जुनी) यांच्या हस्ते पार पडणार असून देवस्थान समितीचे अध्यक्ष मा. मिलिंदजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या भक्तीपूर्ण कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आंबेझरी गायमुख देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *