देवपायलीत पुन्हा बिबट्याचा कहर – 60 वर्षीय महिलेवर थरारक हल्ला!
महामार्ग क्र. 53 परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सडक अर्जुनी=
गोंदिया जिल्ह्यातील महामार्ग क्र. 53 लगतच्या ग्राम देवपायली येथे दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.15 वाजता बिबट्याने 60 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
देवपायली येथील येनुबाई तेजराम गोबाडे (वय 60 वर्षे) या आपल्या घराबाहेर काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुरेश बोरकर यांनी वनविभागाला कळवले. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असले तरी, नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.
❗ वाढता वन्यप्राण्यांचा वावर – जबाबदार कोण?
महामार्गालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत असूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?
गावकऱ्यांचा आरोप आहे की,
पूर्वीही परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते.
तरीही पिंजरे लावणे, गस्त वाढवणे याकडे दुर्लक्ष झाले.
🔥 ग्रामस्थांचा इशारा
बिबट्याला तातडीने जेरबंद करून कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्या कोहमारा वनपरिक्षेत्राचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

