खोबा गोंडी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ व यात्रा 🔱
मोरगाव अर्जुनी=
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोबा गोंडी येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दि. १२ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ, शिवपुराण पारायण, भव्य दिव्य यात्रा व गोपाळकाला महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५.३० वाजता ज्योती प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून या सोहळ्याचे उद्घाटन विनोदभाऊ पडोळे (सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमास माजी समाजकल्याण मंत्री तथा पालकमंत्री आमदार राजकुमार बडोले.आमदार अर्जुनी मोर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महाशिवरात्री निमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यात अखंड हरिनाम, शिवपुराण पारायण, भजन-कीर्तन व गोपाळकाला महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
गुरुमाऊली परमपूज्य महादेव देव्हारे महाराज यांनी खोबा गोंडी व खोबा हल्बी . पासोडी रयत.कोकना. कणेरी.व परिसरातील तसेच तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने खोबा गोंडी येथे श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा अद्वितीय संगम पाहायला मिळणार आहे.
हर हर महादेव! 🔔

