शशीकरण देवस्थान शिव पहाडीवर उद्या भव्य गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रम 

करियर महाराष्ट्र विदेश स्वास्थ्य

शशीकरण देवस्थान शिव पहाडीवर उद्या भव्य गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रम 

सडक अर्जुनी= 

महामार्ग क्र. 53 वरील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गालगत जंगलाच्या सानिध्यात वसलेले जागृत शशीकरण देवस्थान शिव पहाडी येथे आज दिनांक 15/02/2025 रोजी दुपारी 12 वाजता ज्योती प्रज्वलन करून धार्मिक कार्यक्रमाची मंगल सुरुवात करण्यात आली.

योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आनंदराव कापगते महाराज, सुखदेव ठाकूर महाराज, देविदास कोवे, सुरेश बोरकर, दुदुस्वार लांजेवार, गिरीपाल फुले.रमेश इडपाते  . चंद्रकुमार बाहेकार.  सौरभ बडोले.राहुल वणवे.राकेश नांदगावली.गजानन चूठे पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात झाली.

समितीचे अध्यक्ष महेश भाऊ डुंभरे यांनी माहिती देताना सांगितले की, उद्या दिनांक 16/02/2025 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता भव्य गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोगरा, देवपायली, दुग्गीपार, मंदीटोला, राजगुडा, खडकी, ब्राह्मणी, दालली आदी परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

या पवित्र प्रसंगी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोपाल काला व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदराव कापगते महाराज यांनी केले आहे.

🙏 हर हर महादेव! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *