ब्रेकिंग न्यूज | डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका चालकाची गडफास घेऊन आत्महत्या

अपराध महाराष्ट्र शिक्षा स्वास्थ्य

🚨 ब्रेकिंग न्यूज | डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका चालकाची गडफास घेऊन आत्महत्या 🚨

        पोलीस ताब्यातील आरोपीची आत्महत्या? २४ तासांपासून प्रशासनाचे मौन!    

सडक अर्जुनी = तालुका हादरला

डूगगीपार पोलीस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका चालकाला काल दिनांक 15/02/2026 ला पोलिसांनी ताब्यात असलेल्या एका संशयित ॲम्ब्युलन्स चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक चर्चा सध्या तालुक्यात जोर धरत आहे. मात्र या गंभीर प्रकरणावर पोलिस प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह रुग्णवाहिकेतून हलविण्यात आल्याचीही चर्चा असून त्यामुळे संशय अधिकच वाढला आहे.

🔴 महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित

आरोपीने आत्महत्या नेमकी कशी केली?

पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षा व्यवस्था कुठे ढासळली?

२४ तास उलटूनही अधिकृत माहिती का नाही?

घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. पंचनामा व तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रशासनाचे मौन जनतेच्या शंकेला अधिक खतपाणी घालत आहे.

सडक अर्जुनीसह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

👉 या प्रकरणात सत्य काय? आत्महत्या की काहीतरी वेगळे?

जनतेची नजर आता पोलिसांच्या अधिकृत खुलाशाकडे लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *