चिंदादेवीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अपराध महाराष्ट्र शिक्षा स्वास्थ्य

चिंदादेवीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सडक अर्जुनी प्रतिनिधी | 22 फेब्रुवारी

मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर चिंदादेवीजवळील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 1.30 वाजताच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, अग्रवाल ग्लोबल कंपनीने उभारलेल्या नव्या उड्डाणपुलाच्या आरीवालजवळून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दीड ते दोन वर्षे वयाच्या नर बिबट्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने तसेच दुग्गीपार पोलिस ठाण्याचे थानेदार गणेश वनारे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग व पोलिस विभागाच्या पथकाने पंचनामा करून मृत बिबट्याला ताब्यात घेतले.

सदर महामार्गावर वन्यप्राण्यांच्या वावराबाबत यापूर्वीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. वाढत्या वाहनांच्या वेगामुळे वन्यजीवांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर कारवाई वनविभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

👉 या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *