ब्राह्मणी खडकी येथे समीर DEF युरिया पंपाचे उद्घाटन           आदिवासी समाजातील युवा पिढीने रोजगाराकडे वळावे – सरपंच लेखलाल टेकाम यांचे प्रतिपादन

करियर देश महाराष्ट्र शिक्षा

ब्राह्मणी खडकी येथे समीर DEF युरिया पंपाचे उद्घाटन

          आदिवासी समाजातील युवा पिढीने रोजगाराकडे वळावे – सरपंच लेखलाल टेकाम यांचे प्रतिपादन

सडक अर्जुनी =तालुक्यातील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील ब्राह्मणी खडकी येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी समीर DEF (डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड) युरिया पंपाचे भव्य उद्घाटन पार पडले. मोगरा गावातील युवा तरुण राजेश मडावी यांनी ठाकूर ढाबा समोर हा पंप सुरू करून स्थानिक युवकांसमोर रोजगाराचे नवे उदाहरण उभे केले आहे.

उद्घाटन प्रसंगी राजगुडा ग्रामपंचायतीचे सरपंच लेखलाल टेकाम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सडक अर्जुनी तालुका हा आदिवासी बहुल परिसर आहे. येथील युवकांनी कायमस्वरूपी रोजगारासाठी बाहेरगावी किंवा शहरांकडे धाव घेण्याऐवजी आपल्या गावातच उद्योग-व्यवसाय उभारण्याचा संकल्प करावा.

“आदिवासी समाजातील युवकांनी स्वावलंबी व्हावे, कोणताही योग्य व्यवसाय करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली तर गावाचा विकास आपोआप होईल,” असे प्रतिपादन सरपंच टेकाम यांनी केले.

राष्ट्रीय महामार्गावर DEF पंप सुरू झाल्याने ट्रक व इतर जड वाहनधारकांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक उलाढाल वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमास सुखदेव परतेकी, सुभाष कुंभरे, रामू पधरे, देविदास चिचाम, मिथुन मरसकोले, शेषराव कुरसुंगे, मुरली कुरसुंगे, राजेश मातवारे, अनंतराम गेडाम, राकेश सोली, मानसाराम ठलाल, किशोर बालापूरे, चिंतामण चिचाम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले असून, स्थानिक नागरिकांनी नव्या उद्योगाला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *