योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे महंत मंगलसिंह मडावी ( पहलवान) महाराज यांचे निधन

करियर महाराष्ट्र राजनीति स्वास्थ्य

 

योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे महंत मंगलसिंह मडावी

( पहलवान) महाराज यांचे निधन

सडक अर्जुनी 

योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट शशीकरण देवस्थान, देवपायलीचे महंत श्री मंगलसिंह मडावी महाराज यांचे आज रात्री त्यांच्या निवासस्थानी सेंदुरवाफा टोल प्लाजा येथे अकस्मात निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात तसेच मंदिर समितीमध्ये शोककळा पसरली आहे.

महंत मंगलसिंह मडावी महाराज यांनी आयुष्यभर धार्मिक व सामाजिक कार्यातून भक्तांना मार्गदर्शन केले. देवपायली येथील शशीकरण देवस्थान व योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या साध्या, संयमी व सेवाभावी स्वभावामुळे ते भक्तांमध्ये विशेष आदराचे स्थान मिळवून होते.

त्यांच्या निधनामुळे देवस्थान परिसरात हळहळ व्यक्त होत असून भक्तगणांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

त्यांच्यावर आज दिनांक १० मार्च २०२६ रोजी सेंदुरवाफा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक, भक्तगण आणि मोठा मित्रपरिवार असा आप्तस्वकीय परिवार आहे.

शोकाकुल :

योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट,

शशीकरण देवस्थान, देवपायली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *