सडक अर्जुनीत हिंदू एकतेचा महामेळावा — विशाल हिंदू संमेलन.

करियर शिक्षा स्वास्थ्य

सडक अर्जुनीत हिंदू एकतेचा महामेळावा — विशाल हिंदू संमेलन

सडक अर्जुनी | प्रतिनिधी रितेश गडपायले

हिंदू समाजाच्या जागृतीसाठी व सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सडक अर्जुनी येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ मार्च २०२६ रोजी गिरीपुंजे पब्लिक स्कूल, सडक अर्जुनी येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला असून परिसरातील हजारो हिंदू बांधव उपस्थित होते

सनातन संस्कृतीचे जतन, हिंदू समाजाचे एकत्रीकरण आणि समाजात नवीन ऊर्जा व चेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व हिंदू बांधवांना कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्ववी केला

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३.०० वाजता भव्य कलश यात्रेने झाली.त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पाहुण्यांचे आगमन व स्वागत झाले.सायंकाळी ५.०० वाजता संत व वक्त्यांचे प्रबोधन, सायंकाळी ६.०० वाजता राष्ट्रगीत, तर सायंकाळी ६.३० वाजता महाआरती व भोजन असा कार्यक्रमाचा क्रम होता.

या भव्य संमेलनाचे आयोजन समस्त सकल हिंदू समाज, सडक अर्जुनी यांच्या वतीने करण्यात आले असून, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  हिंदू बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *