खोडशिवनीत विधवा महिलांचा सन्मान; महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्

करियर महाराष्ट्र राजनीति

 

खोडशिवनीत विधवा महिलांचा सन्मान; महिला मेळावा व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्

सडक अर्जुनी (प्रतिनिधी):

ग्रामपंचायत कार्यालय खोडशिवनी येथे दिनांक १६ मार्च २०२६ रोजी विधवा महिलांचा सन्मान, महिला मेळावा व आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित या उपक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. ललिता वाढई, सौ. इंदूताई परशुरामकर, सौ. चांगुणा टेंभुर्ने, सौ. खेमुताई परशुरामकर, सौ. दुर्गाताई कापगते, सौ. जयश्रीताई उईके (ग्रा.पं. सदस्या), सौ. सुनिता परशुरामकर, सौ. विद्या परशुरामकर, सौ. दर्शना टेंभूरकर (बचत गट CRP), सौ. योगिता परशुरामकर, सौ. छाया खोब्रागडे, श्रीमती देवकण्या राऊत (अंगणवाडी सेविका), तसेच आशा सेविका सौ. आशा करंडे व सौ. संगीता परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात गावातील एकूण १६२ विधवा महिलांसह इतर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात महिलांची ॲनिमिया, सिकलसेल तसेच इतर आजारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासोबतच पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड तयार करून देण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विधवा महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना ग्रामपंचायतकडून भेटवस्तू देण्यात आल्या. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा आगळावेगळा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सरपंच श्री. गंगाधर परशुरामकर, पं.स. सदस्य श्री. आर. बी. वाढई, उपसरपंच श्री. सत्यवान नेवारे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. ओ. एन. कापगते तसेच सदस्य श्री. आशिष टेंभुरकर, श्री. महेश परशुरामकर, श्री. चंद्रशेखर मेश्राम यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *