वसंत हायस्कूलची पार्शवी कापगते हिची नवोदय विद्यालयात निवड – विद्यालयाचा गौरव!
सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव येथील वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी कु. पार्शवी मोरेश्वर कापगते हिची शैक्षणिक सत्र 2025-26 साठी जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले असून संपूर्ण परिसरात तिचे कौतुक होत आहे.
पार्शवीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री खेमराजजी देशमुख, सचिव श्री वसंतरावजी देशमुख, प्राचार्य, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
पार्शवीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक, तसेच शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले आहे.
तिच्या या यशामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पार्शवीला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

