दु:खद बातमी! हेमलता दामले यांचे आकस्मिक निधन; ग्रामस्थांत हळहळ
खराशी : येथील रहिवासी श्रीमती हेमलता नामदेवजी दामले (वय 55 वर्ष) यांचे आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण खराशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
स्वभावाने प्रेमळ, मनमिळाऊ व सर्वांशी जिव्हाळ्याने वागणाऱ्या हेमलता दामले यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी, नातू-नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता खराशी येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.

