शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

अपराध महाराष्ट्र स्वास्थ्य

शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

सडक अर्जुनी/ : मुंबई–कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर 

शशीकरण मंदिरासमोरील नवनिर्मित उड्डाणपुलावर आज दुपारी सुमारे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहमारा येथून देवरीच्या दिशेने जाणारी मोटरसायकल क्रमांक MH-35-AQ-6771 ला अपघात झाला. या अपघातात जितेंद्र देविदास डोये (वय 20 वर्ष, रा. डोंगरगाव सावली, ता. देवरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश गजानन बारसे (वय 20 वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे.

  यांना त्वरीत सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले 

घटनेची माहिती मिळताच दुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार विजय कोटांगले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत व जखमी युवकांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेचा पुढील तपास दुग्गीपार पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *