महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे खरे प्रणेते : इंजि. आनंद चंद्रिकापुरे
अर्जुनी मोरगाव : भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे खरे प्रणेते होते, असे प्रतिपादन भाजपा गोरेगावचे तालुका सचिव इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांनी केले.
चक्रवर्ती सम्राट अशोक, सम्राट, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून त्यांनी समतेचा मार्ग दाखवला, असे सांगितले. स्त्रीशिक्षण, शेतकरी व मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंचशील नाट्य कला मंडळ यांच्या वतीने दिनांक 11 एप्रिल 2026 ला मौजा महागाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी छगन साखरे, उद्घाटक इंजि. आनंद चंद्रिकापुरे तालुका सचिव भाजपा गोरेगाव, प्रामुख्याने, जयश्रीताई देशमुख जिल्हा परिषद सदस्य, मिथुन मेश्राम, सोनटक्के जी, व्यंकट खोब्रागडे, दीक्षा रामटेके, किशोर तागडे, आशिष टेंभुरकर, प्रमोद लांडगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
इंजि. चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की, आजच्या पिढीने महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक समता व बंधुता जोपासली पाहिजे. त्यांच्या कार्यामुळेच समाजात परिवर्तनाची नवी दिशा निर्माण झाली असून, त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. चक्रवती सम्राट अशोक यांनी युद्धात झालेला रक्तपात जीवित हानी पाहून बुद्धाचे विचार अंगीकार करून देशात 84000 बुद्ध विहार बांधलेत व आपला मुलांना बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी पाठविले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा विचार देऊन हजारो वर्षाची गुलामी संविधानाच्या माध्यमातून दूर केली आणि तुम्ही आम्ही सर्वांना माणसात आणले आज आपण स्वाभिमानाने जगतो ते केवळ बाबासाहेबांमुळेच बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. शिव शाहू फुले आंबेडकर विचारांच्या वारसा घेऊन आपण पुढे गेलो तर नक्कीच आपली प्रगती होईल असे आव्हान आनंद चंद्रिकापुरे यांनी केले.
कार्यक्रमास विविध मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

