डव्वा गावात ईको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा

महाराष्ट्र राजनीति शिक्षा

सडक अर्जुनी= तालुका सडक अर्जुनी येथील ग्राम डव्वा येथे मागील बर्षाप्रमाने याही वर्षी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ईको फ्रेंडली उत्सव साजरा करण्यात आले.गावात जल प्रदुषण होणार नाही याची दक्षता समस्त गावकरी यांनी घेतली आहे कन्हया, गौर प्रमाणे इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यात आला आहे.गावात ग्रामपंचायत डव्वा ने यावर्षी नवीन उपक्रम राबविले आहे.पर्यावरण जनजागृती करण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती यात बरेच स्पर्धक सहभागी झाले होते त्यात घरगुती गणेश पर्यावरण पूरक पंच तत्व वसुंधरा वर आधारित अशी आकर्षित सजावट करण्यात आली सजावट करून समस्त जनताला पर्यावरणा विषयी जनजागृती केली.तसेच गावातील समस्त गणेश भाविक भक्तांनी ग्रामपंचायत ने तयार केलेल्या कृत्रिम टाकीत गणेश विसर्जन करून पर्यावरणाचे रक्षण केले आहे दररोज पुजा नंतर निघणारे निर्माल्य एकत्रित करून खत निर्मिती करण्यात येणार आहे या सर्व अभियानाला समस्त गावकरी, गणेश मंडळ, गावातील बचत गट, तंटामुक्त समिती, महिला भगिनी, युवा -युवती वर्ग,समस्त ग्रामपंचायत कमिटी, श्रीमती योगेश्वरी चौधरी सरपंच, सुनिल घासले उपसरपंच, ग्राप.सदस्य मुनेश्वर चौधरी,एम.डी.वाघाडे,डिलेश्वरी कुरसुंगे, मधुकर गावराने,शालु गुरनुले, मंगला कुरसुंगे,खेमलता राउत, संगीता घासले, एकनाथ गायधने यांच्या सहकार्याने घडुन आला.
*गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी पुनरावर्तित होऊन या!*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *