सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथील घटना
सडक अर्जुनी
तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथे 22 रोजी रात्र दरम्यान आलेल्या वादळीवारा सह विजेच्या प्रभावाने ताराचंद यशवंत डोंगरवार रा . रेंगेपार दल्ली यांच्या दिव्यांका ,नामक पोल्ट्री फार्म वर वीज पडल्याने या घटनेत हजारो कॉकलर कोंबड्या व त्यांच्या पिल्लूंच्या मृत्यू झाल्याची घटना रात्री 2 वाजे च्या सुमारास घडली . यात घटनेत ताराचंद डोंगरवार यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला पुरविण्यात आल्याने तहसीलदार यांच्या आदेशान्वये स्थानिक तलाठ्यांनी आज तारीख 23 रोजी पंचनामा केला असून नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सविस्तर असे की, रेंगेपार येथील ताराचंद यशवंत डोंगरवार यांच्या कुक्कुटपालन व्यवसाय असून त्यांच्या पोल्ट्री फार्म वर हजारो कोंबड्या विक्रीसाठी ठेवण्यात येतात. रेंगे पार येथे 22 रोजी जोरदार पाऊस पडल्याने तसेच त्यांच्या पोल्ट्री फार्म वर वीज पडल्याने या घटनेत कॉकरल कोंबड्या व त्यांचे पिल्लू यांच्या मृत्यू झाला. यामध्ये उद्योजक डोंगरवार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात तात्काळ त्यांनी प्रशासनाला माहिती पुरविली माहितीच्या आधारे पंचनामे करण्यात आले असून योग्य त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे
बॉक्स
यासंदर्भात सामाजिक बांधिलकी जोपासणारे डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी आज तारीख 23 रोजी घटनास्थळी भेट दिली व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा असे मागणी केली.यावेळी प्रामुख्याने प्रतशिल शेतकरी प्रभू डोंगरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष राहुल यावलकर व गावातील युवक उपस्थित होते.