आ.चंद्रिकापुरे यांच्या हस्ते भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाची भूमिपूजन

देश महाराष्ट्र

सडक अर्जुनी
तालुक्यातील भदूटोला येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चांद्रिका पुरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रिका पुरे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. हा मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगितले. आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जे जे आपल्याला शक्य झाले ती बरीच कामे आपण पूर्ण केली अनेक छोट्या कामासह जास्तीत जास्त नागरिकांना ज्यांच्या फायदा होऊ शकतो असे अनेक विकासात्मक कामे आपण या मतदारसंघात केली असल्याची ग्वाही यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश काशिवार, महिला तालुका अध्यक्ष रजनी गिरेपुंजे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाने, शिक्षक तेजराम कापगते, आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर कोरे, मुन्ना भाऊ देशपांडे, क्रिशना ताई कोरे, तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, व गावातील नागरिक धीरज कापगते, सुभाष कापगते,सुमित भराडे, पतीराम कापगते ,अनमोल मानकर, जयपाल झिंगरे ,विश्वास कापगते, विनोद वलकें, पद्मा कापगते, गोपाल कापगते, शोभाताई येरपुडे ,आशा कापगते ,लिलाबाई पुस्तोडे ,मोहित मांडारकर, तुलसीदास यावलकर, लता कापगते ,तुलाराम झिंगरे, तीर्थानंद कापगते, विलास कापगते ,हरिचंद मांडारकर, कृष्णा कापगते ,बाबुराव कापगते, चोप्राम भांडारकर ,भीमराज कापगते ,पतिराम कापगते ,देवदास मानकर, खुशाल सोनवाने, यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *