आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभमिळविण्याकरिता पालक मेळाव्याचे आयोजन

खेल महाराष्ट्र

आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभमिळण्याकरता पालक मेळाव्याचे आयोजन

सडक अर्जुनी = शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा शेंडा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्या वतीने Parental Involvement through Management Committees in Govt Ashram School & EMRS या योजनेच्या अनुषंगाने पालक मेळावा आयोजित करण्यात आला. प्रसंगी पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. पालक शासन यांच्यामध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांची प्रगती समजावी, विद्यार्थी व पालकांचे आयुष्मान भारत कार्ड काढणे, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र बनविणे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, बँकेचे खाते उघडणे, डीबीटी सोबत विद्यार्थ्यांचा मोफत विमा बनविणे, दामिनी पथकामार्फत सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे अशा अनेक उद्देशांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याची सुरुवात क्रांतिवीर धरती आबा भगवान बिरसा मुंडा तसेच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाचे उद्घाटक ग्यारशी रामरामे ग्रामपंचायत सरपंच शेंडा कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय आश्रम शाळेचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोटमवार यांनी करून मेळाव्याचा उद्देश व शाळेत चालत असलेल्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते पवन टेकाम, पत्रकार वामन लांजेवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अरविंद मरसकोल्हे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य छत्रपालजी परतेकी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ओमप्रकाश पंधरे यांनी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक देवरी मा. श्री. प्रवीण डांगे यांनी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना वाईट व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यांना प्रत्यक्षात मिळाल्या पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाला हातभार लावावा, पाल्यासंबंधी शाळा प्रशासनाशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या प्रगतीविषयी माहिती घ्यावी. असे उद्बोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उमेश काशीद सर यांनी केले विद्यार्थ्यांनी आपले जीवन चांगल्या प्रकारे व्हावे याकरिता शाळेमार्फत सुरू असलेल्या विविध योजना जसे नीट, जेईई, स्कॉलरशिप, एनडीए, क्लॅट परीक्षा, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी असे सांगितले. यावेळी पहिल्यांदाच पालकांना प्रकल्प कार्यालय देवरी मार्फत ॲपच्या मदतीने बल्क मेसेज द्वारे निमंत्रण पाठविले होते. पंधरा वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांचे पालकांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले. आधार कार्ड जुने असल्याने व अपडेट नसल्याने डीबीटी मिळण्यात अडचण येत होती. तसेच सरल पोर्टल वरील माहिती अपडेट करण्यात अडथळा येत असल्याने विद्यार्थ्यांचे मोफत आधार अपडेट करण्यात आले. आदिवासी विकास विभागामार्फत शबरी घरकुल योजनेचे लाभ मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वांना मिळतील अशी त्यांनी माहिती दिली विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल याची काळजी मुख्याध्यापकांनी तसेच शिक्षकांनी घ्यावी, बँक खात्यातून नाम मात्र दहा ते बारा रुपये कपात करून विद्यार्थ्यांचे दोन लाखापर्यंतचे इन्शुरन्स काढण्यात येतील, तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या बाबासाहेबांच्या उक्तीचा त्यांनी उल्लेख केला. प्रकल्प कार्यालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती माननीय प्रकल्प अधिकारी यांनी पत्रकार द्वारे दिली. तसेच पालकांशी विशेष संवाद साधून चर्चेद्वारा त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. मा. अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राईटर माईंड चे प्रशिक्षक श्री ए.के. हरिणखेडे माध्यमिक शिक्षक, श्री एन. ए. खोडे उच्च माध्यमिक शिक्षक यांनी विद्यार्थी active झाल्याचे सांगितले. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी डोळ्यावर पट्टी असताना प्रत्यक्ष रंग ओळखणे, वाचन करणे, व्यक्ती स्त्री अथवा पुरुष ओळखणे, कपड्यांचा रंग ओळखणे अशा किमया करून दाखविल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता खोब्रागडे मॅडम प्राथमिक शिक्षिका यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व गावकरी मंडळी उपस्थित होते.
चंद्रमुनी बनसोड सडक अर्जुनी गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *