*प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील : राजकुमार बडोले*
*राजकुमार बडोले माजी मंत्री यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न*
*विविध योजनेंतर्गत १ कोटी ६० लक्ष कामांचे भूमिपूजन*
सडक अर्जुनी :- माजी मंत्री इंजि राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रांतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील लेखाशिर्ष २५१५,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना व इतर योजनेअंतर्गत १ कोटी ६० लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले. 2ऑक्टोबर ला
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या विशेष पर्वावर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी तत्पर आहोत. गावाचा विकास झाला तर विधानसभेचा विकास होईल. त्यामुळे विकासापासून कोणीही वंचित राहू नये या साठी सदैव प्रयत्नशील राहू असे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बडोले माजी मंत्री म्हणाले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री लक्ष्मीकांतजी धानगाये,पंचायत समिती सभापती सौ.संगिताताई खोब्रागडे, उपसभापती श्री.शालीदरजी कापगते, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वर पटले, जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी , जिल्हा परिषद सदस्या निशाताई तोडासे,कृ.उ.बा.स. उपसभापती श्री. विश्वनाथ रंहागडाले,संचालिका सौ. शारदाताई बडोले, मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. रंजनाताई भोई, पं.स.सदस्य श्री.चेतनजी वळगाये,पं.स.सदस्या वर्षाताई शहारे,माजी जि.प. सदस्या सौ.शिलाताई चौव्हाण,तालुका महामंत्री श्री. शिशिरजी येळे,श्री. तुकारामजी राणे,श्री परमानंदजी बडोले,श्री प्रवीणजी भिवगडे,श्री.गुड्डूजी डोंगरवार,श्री विशालजी पर्वते,श्री विनोदजी काशिवार, श्री दिनेशजी शहारे, श्री. अनिलजी गजभिये, श्री हेमराजजी टेंभुर्णे, ग्रा.प. मालीजुंगा संरपच श्री गुलाबजी तोडेफोडे, ग्रा.प. पांढरी संरपच श्री रामलालजी नाईक, ग्रा.प. सितेपार संरपच श्री विनोदजी सलामे,ग्रा.प. घाटबोरी/को. संरपच सौ भुमिताताई बाळबुध्दे, ग्रा.प. बौध्दनगर संरपचा सौ प्रितीताई राऊत, ग्रा.प. वडेगाव संरपचा सौ. रिनाताई तरोणे,ग्रा.प. म्हसवानी संरपच श्री प्रकाशजी रंहागडाले, ग्रा.प. डोंगरगाव संरपचा सौ पोर्णिमाताई गणवीर,ग्रा.प. धानोरी संरपचा सौ. चेतनताई पटले,ग्रा.प. सिंदिपार संरपचा सौ. उषाताई मेश्राम, श्री आशिषजी कवरे,श्री प्रवीण अंबुलेसह भाजप पदाधिकारी, ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.