महामार्गवरील उडणाऱ्या धुळामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात अपघाताची शक्यता…?

महाराष्ट्र राजनीति स्वास्थ्य

महामार्गवरील उडणाऱ्या धुळामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात
अपघाताची शक्यता…?
अग्रवाल कंपनी ची लापरवाही आणि वाहन चालकांना होतोय त्रास…

सडक अर्जुनी= राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर अग्रवाल कंपनी तर्फे उड्डाणपुलाचे काम 2 वर्षभरापासून सुरु आहे. मात्र अग्रवाल कंपनी च्या लापरवाही मुळे सातत्याने नित्कृष्ट दर्जाचे काम होत असून, महामर्गावर धुळाचे साम्राज्य बघायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना समोरचा रस्ता च दिसत नाही. आणि रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
उड्डाणपुलाच्या कामामुळे आणि महामार्गवर पाणी मारत नसल्यामुळे वाहने जाताच मोठ्या प्रमाणात धूर उडतो. यामुळे विशेषतः दुचाकी चालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच नेहमी किरकोळ अपघात सुद्धा घडतात. आणि तरीही अग्रवाल कंपनी याकडे दुर्लक्ष करत असून कुठल्याही सोयी सुविधा यादरम्यान देत नाही.
कोहमारा वारून देवरी ला जाते वेळेस शशीकरणं पहाडी व मासुलकसा घाट मध्ये धुळीचे साम्राज्य आशल्यामुळे मोटारसायकल चालकाला कमालीचा त्रास सहन करावा लागतो ह्या कडे अग्रवाल कंपनीच्या व ध्रुव कॅन्सलटांसी च्या लापरवाही मुळे महामार्गांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे
ह्या धुळी मुळे मागील आठवड्यात एक अनोळखी वेक्तीचा अपघातात जीव गमवावा लागलं
आता NHAI कोणती कारवाही करते ह्या कडे जनतेचे लक्ष लागले आहे
सुरेन्द्र पारिहार लायजनिंग मॅनेजर आग्रवाल कंपनी
फोन केला असता कोणताही प्रतिउत्तर दिलेले नाही
श्री राष्ट्रिय राजपुत करणी सेना सडक अर्जुनी तालुका प्रतिनीधी मुन्नासिघं ठाकूर
निकृष्ट दर्जाचं बांधकाम. व महामार्गावर उडनाऱ्या धुळीमुळे सामान्य जनतेला कमालीचा त्राष सहन करावा लागतो
NHAI च्या अधिकारी यांची मिलीभगत अशक्यामुडे कंपनिवर कोणतीही कारवाही होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *