अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत
सडक अर्जुनी= . मौजा लेंडेपार/ मुरपार येथील दिलीप धोंडू टेकाम (५०)हे अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते. वन विभागाकडून त्यांना पाच लाख रुपयाचे मदत मिळाली आहे, यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन देवचंद तरोने यांनी जखमी व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबातील सभासदांना धनादेश स्वाधीन केले. यावेळी क्षेत्र सहायक कोसमतोंडी फुलचंद शेंडे , श्री केवळराम महादेव काशीवार संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरपार /लेंडे ,श्री नंदकुमार पंढरी काशीवर पोलिस पाटील मुरपार/लेंडे, ठवकर वनरक्षक उपस्थित होते. यावेळी माननीय उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई गोंदिया, सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार यांचे मार्गदर्शनात जखमी व्यक्तीला मदत करण्यात आली.