बाम्हणी/ख. शाळेतील विद्यार्थ्यांची JNV नवेगाव बांध विद्यालयास भेट.
सडक अर्जुनी :- स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाम्हणी /ख. शाळेतील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची JNV नवेगावबांध विद्यालयास सदिच्छा भेट. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालय जवळून पाहता यावं. नवोदय विद्यालयाबाबत आकर्षण वाढावं. मुलांच्या अभ्यासात गती यावी या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लेकचंंदजी शेंडे व सदस्य प्रदीपजी मेश्राम यांचे मार्गदर्शनात सहलीचे आयोजन करण्यात आलं.
दोन दिवसा अगोदरच विद्यालय पाहण्याची परवानगी घेण्यात आली होती. प्रवेश गेटवर पोहोचताच प्रवेश नोंद झाली व सर्व आतमध्ये पोहोचलो. JNV नवेगावबांधच विशाल परिसर पाहून मुले खुश झाली. काही अंतर चालल्यानंतर मुख्यद्वार गाठल.प्राचार्य मा.बलवीर सरांच्या परवानगीने व स्थानिक सरांच्या मदतीने JNV विद्यालय न्याहाळू लागले. सर्व वर्ग खोल्या आधुनिक साहित्याने सुसज्ज होत्या. भव्य वाचनालय, अद्भुत गणित साहित्य व प्रयोग खोली, संगीत वर्ग खोलीची बातच न्यारी, संगीत साहित्य व संगीत शिक्षिकाचं मधुर बोलणं. संगणक कक्षातील अनुभवाबरोबरच प्रथमोपचार खोलीतील अनुभव वेगळा राहिला.
पुढे विद्यार्थी व सर्वजण मोठ्याच्या डायनिंग हॉलमध्ये पोचलो. तिथं मोठं मोठी डायनिंग टेबल लावलेली होती. मुलांनी डायनिंग टेबलवर बसून स्वयंपाकी दादा सोबत मनसोक्त गप्पा मारल्या.प्राचार्य बलवीर सरांनी सर्वांसाठी बिस्किटांची अगोदरच व्यवस्था करून ठेवली होती. टीव्ही पहात पहात मुलांनी बिस्किटे खाल्ली. राहणाऱ्या मुलांची वस्तीगृह जवळून पाहिलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करून मुख्य दारावर परतलो. प्राचार्य बलवीर सरांनी सर्व मुलांना मार्गदर्शन केलं. प्राचार्य बलवीर सरांसोबत फोटो काढून उत्साह व ऊर्जा घेऊन सर्व विद्यार्थी परतले.
नवोदय विद्यालय सहलीचे आयोजन श्री अरुण शिवणकर व श्री देवेंद्र वलथरे सर यांच्या नेतृत्वात करण्यात आल. तसेच श्री. गायधने सर,नेवारे मॅडम,शिवणकर सर,पटणे सर यांच सहकार्य महत्त्वाचे राहिले.