सलंगटोला गाव शुद्ध पाण्यापासून वंचित
सूचनाफलकाच्या जागी लावले बॅनर ते झाले गायब
८८ लाखाची जनजीवन मिशन योजना वाऱ्यावर
दोषीवर ठेकेदार इंजिनीयर यांच्यावर कारवाई करण्याची ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची मागणी
सडक अर्जुनी =तालुक्यातील आदिवासी बिगुल परिसर ग्रामपंचायत कार्यालय राजगुरु अंतर्गत येणाऱ्या कित्येक तरी आदिवासी गावात लोकांची दिशाभूल करून ग्रामपंचायत सचिव इंजिनियर यांनी पैसे कमावण्याचा व्यवसाय सुरू केलाय
मागील काही वर्षापासून सलंगटोला ह्या गावी प्रत्येक घरी दोनदा नळ योजना जोडली गेली पण दोन्ही वेळेस नळाला पाणी आलेच नाही
प्राधिकरणचे प्राधिकरण योजना निघून गेली नंतर जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार पण मागील दोन वर्षापासून राजगुडा ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम सलंग टोला ह्या गावी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीटंकीचा काम अजून पर्यंत पूर्ण न झाल्याने सलंगटोला ग्रामवशी यांना शुद्ध पाणी मिळणार का की पाण्यापासून वंचित राहणार असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झालेला आहे पाणीटंकीचे काम कासवगतीने सुरू आहे विहिरीचे बांधकाम अधुरेच आहे जलजीवन मिशनचे काम अधुरी आहे स्वीच रूमच्या बांधकामाला अजून पर्यंत सुरुवात झालीच नाही योजनेच्या सुपरवायझरला संपर्क केला असता जलजीवन मिशन अंतर्गत च्या सुपरवायझरने ब्राह्मणीवर उडवा उडवीची उत्तरे दिली झालेल्या कामावर कोणताही फलक सूचनाफलक न लावता बॅनर लावण्यात आलं ग्रामपंचायत चे काही कर्मचारी सांगतात की जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाची काही महिन्यापूर्वी मर्यादा संपली ह्या संपूर्ण मंगळ कारभाराला सरपंच सचिव तसेच इंजिनीयर यांच्याकडे चौकशी केली असता काम लवकरच पूर्ण होईल असे उत्तर देण्यात आले आहे बोलताना ग्रामपंचायत सदस्य संघपालची वैद्य यांनी सांगितले
दरवर्षी कामाची सुरुवात पावसापूर्वीच होते नंतर पावसामुळे थांबवल्या जाते तरीपण चलन तुला गावात होत असलेल्या मंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या पाणीटंकीची व शुद्ध पाण्याची सोय व्हावी व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संघपाल वैद्य तसेच गावकऱ्यांनी केली आहे गावात अजून पर्यंत शुद्ध पिण्याचे पाळण्याची भटकंती सुरूच आहे ही लवकरात लवकर दूर करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू पाणी टंकी वर चढून विरोधी आंदोलन करू असा इसारा ग्रामपंचायत सदस्य संघपाल वैद्य यांनी दिला आहे
जिल्हा परिषद सदस्या चंद्रकला डोंगरावर
फोन केला असता सम्पर्क होऊ शकला नाही
आशिष आदमैं पाणी पुरवठा विभाग नवेगाव बांध
चौकशी करून सांगतो
