वीज वितरण व्यवस्थेच्या समस्यांवर आमदार राजकुमार बडोलेनी घेतला आढावा.

महाराष्ट्र राजनीति

 

वीज वितरण व्यवस्थेच्या समस्यांवर आमदार राजकुमार बडोलेनी घेतला आढावा.

दि. २० फेब्रुवारी २०२५
सडक अर्जुनी :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत वीज वितरण व्यवस्थेच्या अडचणी, सुधारणा व भविष्यातील नियोजन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी, तसेच शेतकरी व निवेदकर्त्यांनी सहभाग घेतला. बैठकीदरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा होऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले असून, लवकरच सुधारणा कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

बैठकीस पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, जिल्हा परिषद सदस्य भुमेश्वर पटले, जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, कृ.ऊ.बा.स. सभापती अविनाश काशिवार, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, गौरेश बावनकर, दिनेशजी कोरे, किशोर डोंगरवार, अमर रोकडे, महेश परशुरामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *