सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे वन संवर्धन व व्यस्थापन आराखडा तयार करण्याकरीता कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र शिक्षा

सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समित्यांचे वन संवर्धन व व्यस्थापन आराखडा तयार करण्याकरीता कार्यशाळा संपन्न
सडक अर्जुनी
दिनांक १७ एप्रिल २०२५ ला जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे अनुसूचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ मधील तरतुदीनुसार गोंदिया तालुक्यातील ९८ व गोरगाव तालुक्यातील २५ असे एकूण १२३ गावांना जिल्हास्तरीय वनहक्क समिती द्वारे सामुहिक वनहक्क सन २०१५ ते २३ दरम्यान मंजूर करण्यात आले. त्यावर ग्रामीण भागातील आदिवासी व ईतर पारंपारिक वननिवासी यांच्या कल्याणाकरीता ग्राम सभांचे सामुहिक वनहक्कांचे वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करून शास्वत विकासा करीता एकात्मिक आदिवासी विकास विभाग, प्रकल्प देवरी यांच्या सहकार्याने १२ सप्टेंबर २०२२ चे शासन निर्णयानुसार जिल्हात वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे कार्य सुरु आहे. तसेच आदिवासी विकास विभागा मार्फत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, प्रकल्प देवरी यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकेतून दिली.
कार्यशाळेत वनपिपल फाउंडेन चे संचालक ललित भंडारकर यांनी उपस्थित समितीचे पदाधिकारी व इतर सहभागी सदस्यांना वनहक्क कायद्यातील नियम ३ (१)(ग) मधील प्राप्त गौण उपज संकलन, व्यवस्थापन करीता स्वामित्व अधिकार, नियम ३(१)(घ) नुसार तलावांचे अधिकार त्याचबरोबर कलम ५ नुसार वन्य जीवन,वन व जैविक विविधता यांचे संरक्षना करीता सदर अधिनियमान्वये ग्रामसभांचे जबाबदा-या व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले.
वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्याकरीता ग्राम सभांचे सहभाग, शिवारफेरी, वनातील वास्तविक स्थिती, जलग्रहण क्षेत्रे, याद्वारे कामांचे नियोजन व ग्राम सभा द्वारा आराखड्याची मंजुरी याबाबत संपूर्ण विस्तारीत मार्गदर्शन प्रशिक्षक अनुप जामोदकर, तालुका व्यवस्थापक, यवतमाळ यांच्या द्वारे करण्यात आले.
कार्यशाळेत सहभागी वन विभाग, महसूल विभाग, पंचायत विभाग व ईतर शासकीय यंत्रणा व ग्रामसभांचे पदाधिकारी यांचे वनहक्का बाबत व आराखडे तयार करण्याबाबतचे अनेक प्रश्नाचे निराकरण करण्यात आले ज्यात वनभूमी वरील व बफर आणि कोर क्षेत्रातील कामे, नियोजन आराखडा, ग्रामसभांचे रोहयो करीता पोर्टल वरील मंजुरी यावर प्रकल्प अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
एक दिवशीय कार्यशाळेत गोंदिया जिल्ह्यातील गोरगाव व गोंदिया तालुक्याचे सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे जवळपास ३५० अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी सहभाग घेवून वनहक्क कायद्यातील माहिती व आराखडा तयार करण्याकरिता माहिती जाणून घेतली व आप-आपल्या गावांचे वन संवर्धन व व्यवस्थापन आराखडे आदिवासी विकास विभाग व वनपिपल फाउंदेशन यांच्या सहकार्याने तयार करून गावविकास करण्याचे संकल्प उपस्थित सदस्यांनी केले.
जुगल राहांगडाले, फोरमन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांनी प्रजीत नायर, जिल्हाधिकारी गोंदिया व एम. मुरुंगनाथम, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीदार गोंदिया यांचे विशेष सहकार्याकरीता तसेच सहभागी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व ग्राम सभा पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.
कार्यशाळेला यशस्वी करण्याकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे, तोडकर,वाघाडे, वलथरे, वंदना मडावी, कोयल गणवीर, तारा मडावी तसेच वनपिपल फाउंडेशन चे संचालक कामेश भोरजारे, नवीन गुप्ता व संस्थेचे तालुका समन्वयक विशाल लिल्हारे, जितेश माहुले, केवळराम मडावी, अरविंद फुंडे, विनायक गोबाळे, लक्ष्मिकांत तिरपुडे यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यशाळेत सहभागी शासकीय विभागांचे अधिकारी व समितीचे पादाधीकारी

मार्गदर्शन करताना प्रकल्प अधिकारी उमेश काशीद

मार्गदर्शन करताना वनपिपल फाउंडेशन चे संचालक ललित भंडारकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *