ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथील बालरुग्ण भर दुपारी बाहेर वरांड्यात डॉक्टरांच्या प्रतीक्षेत.
सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयातील एक प्रकार, आठवड्यातील प्रत्येक सोमवार व मंगळवारी बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर मेश्राम हे येत असतात, सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण आहे, व जवळपास बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने तालुक्यातील व इतर देवरी परिसरातील बालरुग्ण याठिकाणी उपचाराकरिता येत असतात. परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी करिता स्वतंत्र्य खोली नसल्याने ते बाहेर वरांड्यात बसून लहान बालकांची तपासणी करतात. भर उन्हाळ्यात दुपारी लहान-लहान नुकतेच जन्मलेले ते चार पाच वर्षाचे बालके यांना घेऊन त्यांचे आई-वडील हे बाहेर वरांड्यात रांगेत सकाळपासून उभे असतात.
आणखी याठिकाणी दुसरे कोणतेच वैद्यकीय अधिकारी नसल्याने मध्येच त्यांना इतर कार्यालयीन कामाकरिता, शवविच्छेदन करिता, बाकी इतरही कामे करण्याकरिता त्यांना वारंवार जावे लागते त्यामुळे बालकांचे खूप हाल होताना निदर्शनाश येते.
करिता या ठिकाणी प्रशासन व स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांनी या गोष्टीचे गांभीर्याने दखल घेणे अत्यावश्यक आहे.
