डव्वा ग्रामपंचायत तर्फे डस्टबीन वाटप
कंपोस्ट खड्डा भरू , आपले गाव स्वच्छ ठेवु “.
सडक अर्जुनी=
या शासनाच्या संकल्पनेतून
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त डव्वा गाव सेंद्रिय खताचा वापर करण्याच्या उद्देशाने १ मे १५ सप्टेंबर १३८ दिवसाचे मोहिम डव्वा गावाने राबविण्याचे संकल्प केला आहे.डव्वा गावात या मोहिमेची सुरुवात सम्मानिय पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते.श्रीमती योगेश्वरी सी.चौधरी सरपंच यांच्या मार्गदर्शनेत ग्रामपंचायत कमिटी कडुन”कंपोस्ट खड्डा भरू* , *आपले गाव स्वच्छ ठेवु* “.ही मोहीम राबविण्यासाठी ग्रामपंचायत ने२०२४-२०२५ च्या आर्थिक वर्षात ज्यांनी कर भरले अशा लाभार्थ्यांना डस्टबीन वाटप केले व घनकचरा व्यवस्थापन चे मार्गदर्शन सरपंच यांनी केले व नागरीकांनी या अभियानाचे स्वागत केले आहे.