प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे काळाची गरज
डॉ. सुगत चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी
तथागत गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा शील करुणा व शांतीच्या मार्ग दाखविला. आजही जगातील अनेक देशात बौद्ध धर्मियांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याचे कारणच असे आहे की, तथागतांनी मानव जातीला जी शिकवण दिली या सोबतच जे पंचशील दिले ,त्याचा अनुकरण सुद्धा प्रत्येक व्यक्तीने करावे. पंचशीलाचे पालन आपल्या जीवनात जर केले तर असे लक्षात येईल की बौद्ध धर्म हा जगातील एक सर्वश्रेष्ठ धम्म असून प्रत्येक व्यक्तीने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे आज काळाची गरज ठरली आहे. असे प्रतिपादन डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.ते
मौजा शेंडा येथे पंचशील बौद्ध स्मारक समितीच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य रामपाल महाराज धारकर यांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समाज प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदाताई बडोले यांच्या हस्ते, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य चंद्रकलाताई डोंगरवार, आनंद चंद्रिकापुरे, शेंडा येथील सरपंच भीमराव राऊत, सरपंच ललित शहारे, सरपंच माधवराव तरोने , कामगार जिल्हा नाका अध्यक्ष जितेंद्र शहारे, कृषी सहाय्यक राजशेखर राणे,पंचशील स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक मेश्राम, महिला अध्यक्ष लताताई कोटांगले, समितीचे उपाध्यक्ष ताराचंद बनसोड, महिला उपाध्यक्ष भारतीताई गणवीर, ऑडिटर देवेंद्र मानकर,बिरला गणवीर, शाहिद शेख,निलेश शहारे, निवासी आश्रम शाळा येथील शिक्षक चव्हाण सर, सिद्धार्थ उंदीरवाडे, फुलूके, भारती गणवीर राजकुमार बनसोड, चंद्रमुणी बनसोड, कृपासागर जनबंधू, ग्रामपंचायत सदस्य छत्रपाल परतेकी, तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक नंदकिशोर वैद्य यांनी केले. तर संचालन लालचंद गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी व इतर नागरिक उपस्थित होते.
