घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती द्या; एसडीओ वरून शहारे यांना निवेदन
उपोषणाला बसण्याचा इशारा
सडक अर्जुनी राज्य शासनाच्या
निर्देशानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचे सुचना करण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने गोंदिया व सडक अर्जुनी तालुक्यात तालुका प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी घाट निश्चित करून त्यांना रेती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
सडक अर्जुनी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे घर बाधकाम अर्धवट आहेत. शासकीय बांधकामाचे विकास कामे व घर बांधकाम अर्धवट असल्याने रेती वाढू उपलब्ध करून ३० एप्रिलच्या रेती धोरणानुसार डेपो व घाट निश्चित करण्यात आले. तसेच घरकुल योजनेंतर्गत पाच ब्रास रेती
वाटपाचे उद्दिष्ठ तालुका प्रशासनाला देण्यात आले. मात्र सडक अर्जुनी तालुक्याचा विचार केल्यास तालुका प्रशासनाच्या वतीने अद्यापही उद्दिष्ठ पुर्ण
झाले नाही. घरकुल लाभार्थ्यांना स्वतःचे वाहन तयार करून रेती आणण्याचे निर्देश देण्यात आले परंतु यावरही प्रशासकीय यंत्रणेने कारवाई बडगा उचलल्याने मोफत
रेतीचा उद्देश काय? असा सवाल घरकुल लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. परिणामी अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहेत.
तेव्हा प्रशासकीय यंत्रणेने रेती उपलब्ध करून देण्यात यावी यासह इतर मागण्या ज्यामध्ये सावंगी रेती घाटाची चौकशी करण्यात यावी, बांधकामाकरिता पाच ब्रास स्वामित्वधन, ६०० रुपये प्रति ब्रास प्रमाणे देण्यात यावे, जप्ती केलेला रेतीसाठी घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा, सौंदड डेपोची जागा बदलण्याला मंजुरी देण्यात येवू नये अशा विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी माधोराव तरोणे, आशिष येरणे, गोलु फुंडे, सुधिर हेमने, रेहान शेख, गौरव चुटे, राजेश परशुरामकर, फैज शेख, महेश डुंबरे, दीपक गहाने आदी उपस्थित होते.