वरूणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा
@ बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का?
@तालुक्यात २१ दिवसांत १८ मिमी पाऊस,१.६ टक्केच धान पऱ्हे तयार.
सडक अर्जुनी : अनिरुद्ध वैद्य
” येरे येरे पावसा, तुला देतो पैसा ” ही पारंपरिक साद सध्या सडक अर्जुनी तालुक्यात गुंजत आहे. मृग नक्षत्र संपत आला असतानाही पावसाचा पत्ता नाही. आषाढ महिन्याची चाहूल लागली तरीही आकाशात ढग नाहीत आणि जमीनीवर ओल नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेच्या सावटाखाली सापडला आहे.
शेतकरी वर्ग पेरणीसाठी सज्ज झाला असतानाच पावसाने हुलकावणी दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे. मान्सूनपूर्व सरिंचा पत्ता नाही आणि मृग नक्षत्रातील अपेक्षित पाऊसही कोरडा गेल्याने तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. काही भागात दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती आहे. पाण्याअभावी पिके करपपण्याचा धोका आहे.
*बेडकाने दिला दगा, गाढव तारेल का?*
एप्रिल – मे महिन्यात तालुक्यात वादळी पावसाने थैमान घालून उन्हाळी धान, मका, भाजीपाला पिकांची प्रचंड हानी केली. आता पावसाळ्याला सुरवात होऊन २० – २५ दिवस लोटले असताना, अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. यामुळे सामान्यांना सह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २२ जूनला आर्द्र नक्षत्राला सूरूवात होईल. मृगाच्या बेडकाने दगा दिला, आर्द्राचा गाढव शेतकऱ्यांना तारणार का? असा प्रश्न पावसाच्या हुलकावणी नंतर जनतेला पडला आहे.
*चित्रसेवा* : अनिरुद्ध वैद्य
