हृदयदावक! भरधाव ट्रेलरने महिलेला चिरडले, देवरी नवाटोला येथील घटना
Breaking News June 23, 2025
देवरी: राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या देवरी शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या महामार्गावर अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले असून यावर उपाय योजना कागदोपत्रीच आहे. देवरी शहरालगत असलेल्या नवाटोला येथे एका ट्रकच्या / ट्रेलरच्या धडतेत चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सेखा सुरेश पंधरे (वय ३६) वर्ष रा. गिरोला ता. सालेकसा असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. जियालाल महादेव छोटे राह. सोनारटोला असे जखमी इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर महिला ही सदर इसमासोबत दुचाकी ज्युपिटर एम एच ३५ ए व्ही ४५८७ गाडीवरून नवाटोलाकडून शिरपूर/बांध कडे येथे जात होते. नवाटोला येथिल राष्ट्रीय महामार्ग वर असलेल्या सुखसागर हॉटेल समोर येताच ट्रक क्र. सी जी ०४ एन के ३७२६ या ट्रेलरने धडक दिल्याने गाडीवरील महिला ही ट्रेलरच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाला.
सदर अपघाताची माहिती देवरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.सदर ट्रेलर घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. पण समोर शिरपूर येथील चेक पोस्ट नाका येथे त्याला पकडण्यात आला आहे. मयत महिला ही भाड्याने नवाटोला येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे.