धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मकरधोकडा येथे शिबिराचे आयोजन

करियर करोबार खेल देश मनोरंजन महाराष्ट्र विदेश शिक्षा स्वास्थ्य

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत मकरधोकडा येथे शिबिराचे आयोजन

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत गोंदिया जिल्हयातील 104 आदिवासी गावांमध्ये 15 जून ते 30 जून 2025 दरम्यान विशेष जनजागृती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 23.06.2025 रोजी अनुदानित आश्रमशाळा मकरधोकडा ता.देवरी येथे धरती आबा जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.श्री.महेंद्र गणविर तहसिलदार,देवरी, श्री.शुभम हुजरे, नियोजन अधिकारी, प्रकल्प कार्यालय, देवरी श्री. डी.के बारसे, नायब तहसिलदार, श्री.पी.एम.नामुर्ते, नायब तहसिलदार, श्री.पी.बी सलामे,सदस्य, पंचायत समिती, देवरी श्री. विनोद वरखडे उपसंरपंच श्री.मनिष तुरकर पोलीस पाटील श्री.अमोल बडवाईक श्री.के.एस.ईलमकर मुख्याध्यापक, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातील मा.श्री.महेंद्र गणविर तहसिलदार,देवरी यांचे हस्ते महाराष्ट्र राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसुर्य भगवान बिरसा मुंडा, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना श्री.शुभम हुजरे नियोजन अधिकारी ए.आ.वि.प्रकल्प कार्यालय देवरी यांनी प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) च्या धरतीवर धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची दिनांक :- 2 आक्टोबर 2024 रोजी सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेत अंमलबजावणीसाठी 25 प्राधान्य क्षेत्रे व 17 मंत्रालये निश्चित करण्यात आली असुन याव्दारे आदिवासी जमातीच्या सामाजिक आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दीष्टे आहे. (PM-JANMAN) च्या धर्तीवर (DA-JGUA) या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान गोंदिया जिल्हयातील 104 आदिवासी गावांमध्ये 15 जून ते 30 जून 2025 दरम्यान राबविण्यात येत असल्याबाबतची माहिती दिली. त्यापैकी देवरी तालुक्यातील 49 गावांची निवड झालेली असुन आदिवासी समाजातील सर्व घटकांनी एकाच छताखाली एकाच वेळी सर्व आवश्यक कागदपत्रे व योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असुन तेव्हा आपण सर्वांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिबिर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषनादरम्यान श्री.महेंद्र गणवीर, तहसीलदार यांनी उपस्थित लाभार्थींनी आयोजित करण्यात आलेल्या शिबीराच्या माध्यमातून ग्रामीण जनतेने या संधीचा पुरेपुर फायदा घेण्याचे आवाहन केले, व जनतेने त्यांच्या आवशयक कागदपत्रे विषयी काही अडीअडचणी असतील तर संबंधीत विभागाशी संपर्क करुन माहिती घ्यावी असे सुचित केले तसेच उपस्थित विभाग/यंत्रणा अधिकारी यांनी गरीब जनतेचे प्रश्न समजावून घ्यावेत व आवश्यक कागदपत्रे विनाविलंब उपलब्ध करुन देण्यात यावेत व योजनेचा लाभ देण्यासंदर्भात निर्देश दिले.
सदर शिबिरादरम्यान श्री. निरंजन सिताराम परतेकी, श्री. राजेंद्र मेहतर कोराम, श्री. बिसनलाल मेहतरू कोराम, श्री. विनोद बिजलाल ताराम, श्री. अशोक मनिराम परतेकी, श्री. शिशुपाल बिसराम टेकाम, श्री. बिंदुपाल धनीराम कोडवते, श्री. रविंद्र कुवरलाल मडावी इ.कमी कालावधीत घरकुल बांधकाम पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना घराच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते सोपविण्यात आल्या.

अनुदानित आश्रमशाळा, मकरधोकडा ता.देवरी येथे आयोजित शिबिरामध्ये सकाळी 10.00 ते 5.00 च्या दरम्यान एकुण 09 कार्यालयांनी लावण्यात आलेल्या स्टॉल च्या माध्यमातून शिबिरामध्ये 256 ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून त्यामध्ये मतदार ओळखपत्र, आधार कार्ड,रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र,जॉब कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड,पीएम-किसान,जनधन खाते,अटल पेंशन योजना,पीएम सुरक्षा योजना,ई-श्रम कार्ड अशा अनेक दाखले लाभार्थींना लाभ प्राप्त झाला आहे. यामध्ये अनुसूचित जमातीचे 238 लाभार्थींना लाभ मिळाला आहे. एकाच छताखाली व अगदी कमी वेळेत लाभ मिळाल्याने चेहऱ्यावर आनंद दिसुन येत होता.

यावेळी तहसिल कार्यालय देवरी व अप्पर तहसिल कार्यालय चिचगड तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच अधिक्षक व कर्मचारी अनुदानित आश्रमशाळा, मकरधोकडा तसेच ग्रामपंचायत सरपंच, ग्रा.पं. सदस्य व गावांतील लोकांनी यांचे सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *