कोहमारा येथील सिमेंट रस्ता निकृष्ट दर्जाचा
रोडला पडल्या भेगा
सरपंच यांनी रोडचे काम केले त्वरित बंद
सडक अर्जुनी= तालुक्यांतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा येथिल वार्ड क्रमांक 2 मधील कोहमारा गोंदिया हायवे ते येरणे यांच्या घरा पर्यन्त आमदार निधी 2515 अन्तर्गत 5 लक्ष रुपयाचे सिमेंट रोड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत अशल्याचे बोलले जात आहे
गोंदिया कोहमारा रोड लगत सिमेंट रोड तयार करण्यात आलेला आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून त्या रोडला भेगा पडल्या आहेत सिमेंट रस्त्या बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी ग्रामपंचायतला कोणतीही पूर्वसूचना न देता स्वतःच्या मन मर्जीने निष्काळजीपणाने पैसे कमावण्याच्या नादात सिमेंट रोड तयार केल्याचे बोलले जाते आहे
सिमेंट रोड बांधकाम करत असताना कोणत्याही पद्धतीचे बीटमिन प्याड टाकण्यात आले नाही
त्या मूळे रोडला भेगा पडून रोड फूटने सूरू झालं आहे
कोहमारा गोंदिया हायवे ते येरने च्या घरा पर्यांत सिमेंट रोड कीचाड मध्ये तयार होत आहे …?
कोणत्याही पद्धतीची प्लास्टिक न हातरता कोणतीही पद्धतीचे GSB न टाकता सिमेंट रोड बनविण्यात येत आहे सदर रोड रास्ता ईस्टिमेट नुसार तयार करण्यात यावं अशी कोहमारा ग्रामवासीयांची मागणी आहे
सरपंच ग्रामपंचायत कार्यालयं कोहमारा
प्रतिभाताई देवीदास भेंडारकर
ग्रामपंचायत कार्यालया ला कोणतीही पूर्व सूचना दिली नाही सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे दोन्ही सिमेंट रोड तयार करण्यात येत आहेत.इस्टिमेट नुसार सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात यावा सिमेंट रोड मध्ये बेट्वीन पॅड टाकलेलं नाही आहे त्यामुळे गेडाम च्या घरासमोरील सिमेंट रस्ता तुटला आणि रोडला मोठ्या भेगा पडल्या आहेत