शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, नाली साफसफाई केव्हा करणार
जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य
सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याकरिता, तिन्ही गावातील गावकऱ्यांनी केली मागणी.
काही मोजक्या नाल्यांची केली जाते साफसफाई…
नियमित साफसफाई होत नसल्याने नाल्या तुंबल्या व तुटलेल्या अवस्थेत आहेत:- *ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष*
*सडक अर्जुनी *
पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे. गावातील विजेच्या खांबावरील अनेक पथदिवे गेल्या पाच महिन्यापासून बंद आहेत.
पावसाळ्यात विषारी साप, विंचू, कीटकाची भीती आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला पथदिव्याविषयी कित्येक वेळा सांगितले असता, ग्रामपंचायत प्रशासन जाणून दुर्लक्ष करीत आहे. जर गावातील एखाद्या नागरिकाशी अनुचित घटना घडली तर, याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील.
*:- जितेश मानवटकर ,आनंद इडपाते ,मार्कंड उईके, राष्ट्रपाल बनसोड सामाजिक कार्यकर्ता*
पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत ग्रामपंचायत शेंडा येथील मागील अनेक वर्षापासून गावातील विविध भागातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे, घाण पाणी वाहणाऱ्या नाल्या कचरा व घाण पाण्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. नालीतील घाण पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्काळ गावात स्वच्छता मोहिम राबवून नाल्यांची साफसफाई तात्काळ यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत शेंडा हद्दीतील गावात नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही. परिणामी येथील बऱ्याचशा नाल्या कचऱ्याच्या ढिगाने भरल्या आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे स्वच्छतेची मागणी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ग्रामपंचायत पदाधिकारी जाणून गावाच्या साफ सफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. गावातील वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्यामुळे नाल्या भरलेल्या दिसत आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात नाल्यातून पाणी ओरफ्लो वाहत असल्याने नाल्यांलगत असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण गावात स्वच्छता मोहिमा राबवून नाल्यांची वेळीच साफसफाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे.