कृषी च्या विद्यार्थ्यांतर्फे वसंतराव नाईक यांची जयंती तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण
सडक अर्जुनी, दि. 2 जुलै
राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ कृषी व्यवसाय सडक अर्जुनी च्या विद्यार्थ्यांनी दि. 1 जुलै रोजी तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र चे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करून मुलांना कृषी विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमला ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्याचे महत्व त्यांचे संगोपन यांचे महत्व पटवून देण्यात आले.
यावेळी राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ कृषी बिजनेस मॅनेजमेंट सडक अर्जुनी चे विद्यार्थी आशिष चौहान, हिमांशू अग्रवाल, अनुसंग वासनिक, रिषभ हातझाडे, आर्यन रोहणकर या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपनाची माहिती देत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प घेतला.