विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवशीय कार्यशाळा
गोंदिया
दि. २४/०६/२०२५ मा. श्री प्रजित नायर, जिल्हाधिकारी साहेब गोंदिया व मा.श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, गोंदिया येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दि. २४/०६/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासुन सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय गोंदिया येथे विशेष बाल पोलीस पथक व बाल कल्याण पोलीस अधीकारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली.
सदर प्रशिक्षणात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२, बाल विवाह प्रतिबंध अधिनीयम २००६, बालकांचे संबंधीत काम करणाऱ्या जिल्हयातील विविध यंत्रणा, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळा समोर बालकांना सादर करतांना अनुसरावयाची कार्यपध्दती, त्याकरीता लागणारे आवश्यक कागदपत्रे व बालकांचे पुनर्वसन, अत्यंत संवेदनशील पणे व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माती, बालकांच्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही या करीता प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्य करण्यासाठी नियोजन तयार करणे, बालकांविरोधी हिंसा, उपेक्षा आणि अत्याचार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीसांची महत्वपुर्ण भुमीका, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ बालकांच्या सहाय्यतेसाठी 24×7 दिवस काम करणारे जिल्हयातील महत्वपुर्ण यंत्रणा, दत्तक विधान प्रक्रिया, सखी वन स्टॉप सेंटर, महिला व बाल विकास विभागाच्या योजना, बालस्नेही, अशा विविध विषयाचे विश्लेषन करुन मार्गदर्शकांनी सखोल मार्गदर्शन केलेले आहे. सदर कार्यशाळे मध्ये गोंदिया जिल्हयात १६ पोलीस स्टेशनचे बालकल्याण पोलीस अधीकारी यांना बालस्नेही व सखी माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण कार्यशाळा ही मा.श्री. एन. के. बालके साहेब, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली आणि श्री शेवते, पोलीस उपअधिक्षक गोंदिया, श्री. प्रविण मुंडे पोलीस निरीक्षक आर्थीक गुन्हे शाखा गोंदिया, श्रीमती मनिषा निकम, सहा. पोलीस निरीक्षक, भरोसा सेल गोंदिया, श्री पवन रोकडे दुकाने निरीक्षक प्रतिनिधी सहा. कामगार आयुक्त गोंदिया, श्रीमती देवका खोब्रागडे अध्यक्षा बाल कल्याण समिती, गोंदिया श्री. के.बी. रामटेके, परिविक्षा अधिकारी गोंदिया, श्री. गोबाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोंदिया, श्रीमती सपना सिडाम, पोउपनिरी भरोसा सेल गोंदिया, श्रीमती पुजा सुरूडकर, दामिनी पथक गोंदिया, श्री अशोक बेलेकर, संचालक (आसरा शिशुगृह/बालगृह) इंडियन सोसियल वेल्फेअर सोसायटी, गोंदिया, श्रीमती मनिषा आंबेडारे, अधिक्षीका, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह, समिना खान, केंद्र प्रशासक, सखी वनस्टॉप सेंटर गोंदिया यांचे विशेष उपस्थितीमध्ये घेण्यात आली आहे.
सदर कार्यशाळेमध्ये गोंदिया जिल्हयातील विशेष बाल पोलीस पथक व बाल कल्याण पोलीस अधीकारी, जिल्हा महिला व बालविकास कार्यालया गोंदिया, बालन्याय मंडळ, दामीनी पथक, भरोसा सेल, अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा गोंदिया एन जी.ओ., वन स्टॉप सेंटर ईत्यादी कार्यालयातील एकुण ८९ अधिकारी व कर्मचारी हजर होते.
सदर कार्यशाळेचे आयोजनाकरीता सपोनी मनिषा निकम, मपोउपनिरी सपना सिडाम, मपोहवा तनुजा मेश्राम, मनापोशि सुशीला बघेले, पोहवा कमलकिशोर तुरकर सर्व नेमणुक भरोसा सेल गोंदिया यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.