रत्नदीप विद्यालयाचे तीन विद्यार्थी ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित .
( आरंभ फाऊंडेशन इंडियाचा उपक्रम)
सडक अर्जुनी.
आरंभ फाऊंडेशन इंडिया
पळसगाव / राकाच्या वतीने रत्नदीप विद्यालय चिखली येथील मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक’ पुरस्काराने 3 जुलै 2025 ला सन्मानित सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.एम. पातोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून फाऊंडेशनचे संचालक भोजराज रामटेके, प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम
उपस्थित होते.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आरंभ फाऊंडेशनद्वारे
सन 2025 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून
प्रथम क्रमांक पटकाविणारी कु.प्रिन्सि ज्ञानेश्वर साखरे, द्वितीय भुमेश्वर पुष्पकुमार झंझाड व तृतीय कु.वर्षा देवराम तरोणे आदी तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, नोडबुक ,पेन व पुष्पगुच्छ देऊन संस्थापक/ अध्यक्ष प्रमानंद
रंगारी व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थीनी कु.प्रिन्सि साखरे हिने मिळालेल्या पुरस्काराबाबद आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थापक प्रमानंद रंगारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, ‘विद्यार्थ्यानी एकमेकांशी इंग्रजीत बोलावे. हिम्मत हारु नये. जिद्द ठेवावी.मेहनत घ्यावी. अभ्यासाकडे लक्ष देऊन ध्येय ठरवावे. इतरांशी आपुलकी,प्रेम व जिव्हाळ्याने वागावे’.तसेच विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील असावे असे संचालक भोजराज रामटेके यांनी मार्गदर्शनात सांगितले.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत ज्ञान घेत राहावे आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी सतत प्रयत्न करावे असे मुख्याध्यापक एम . एम.
पातोडे यांनी सांगितले.
प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम यांनी आरंभ फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविकेतून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस. बी.मेंढे यांनी केले तर आभार शिक्षिका कु.आर. एम. पर्वते यांनी मानले.
कार्यक्रमाला शिक्षक पी.एच. पटले, एच. ए. लांडगे ,एस.जे. खोब्रागडे, कु.जे. एस.कढव ,डी. डी.कापगते, वाय. जी. कोरे, एम. डब्ल्यू. शिवणकर आदी उपस्थित होते. उल्लेखनीय म्हणजे, आरंभ फाऊंडेशनचे संस्थापक प्रमानंद रंगारी यांनी रत्नदीप विद्यालय चिखलीतून इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले असून सध्या ते अमेरिकेत नोकरीवर आहेत. फाऊंडेशनच्या वतीने ते गुणवंत विद्यार्थ्यांसाठी
एक मदत कार्य म्हणून विविध उपक्रम राबवित आहेत.
सडक अर्जुनी _ रत्नदीप विद्यालय चिखली येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना फाऊंडेशनचे संस्थापक प्रमानंद रंगारी, मुख्याध्यापक एल.एम.
पातोडे,संचालक भोजराज रामटेके, प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम व उपस्थित शिक्षक