वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक….
देवरी, दि.04 ; उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी व अभियंते यांच्या खाजगी करणविरोधी संपाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात पुकारलेल्या ९ जुलैच्या संपाच्या तयारीसाठी देवरी कार्यकारी अभियंता कार्यालियाच्या प्रांगणात संपकरी संघटनाची द्वार सभा झाली. समांतर वीज परवाना, वीज उद्योगाचे खाजगीकरण व कंत्राटी कामगारांचा प्रश्न, पेंशन, रिक्त जागा भरती या संपाच्या नोटीमधील बाबींवर सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोशिएशन, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, वर्क्स फेडरेशन, तांत्रिक कामगार युनियन, इंटक फेडरेशन या संपकरी संघटनांच्या पदाधिकार्यांनी द्वार सभेला संबोधित केले.
महारष्ट्र शासन व तिन्ही वीज कंपन्यातील व्यवस्थापनाच्या खाजगीकरण- कंत्राटीकरण धोरणाविरुद्ध, अदानी-टोरंट कंपन्यांच्या समांतर वीज परवाना धोरणाविरूद्ध, स्मार्ट मीटरयोजने विरुद्ध, जलविद्युत निर्मिती केंन्द्राचे खाजगीकरण, ४२ हजार कंत्राटी-बाह्स्त्रोत कामगारांना कायम करण्याच्या मागणीसाठी, महावितरण कंपनीची ३२९ सबस्टेशन्स खाजगी कंत्राटदारांना चालविण्यास काढलेल्या निविदा रद्द करण्यास्तव, महापारेषण कंपनीच्या २००० कोटी रुपयांवरील प्रकल्प खाजगी कार्पोरेट कंपन्याना देण्याविरोधात महावितरण कंपनीच्या पुनर्रचना प्रस्ताविरुद्ध, सर्व सहाय्यकांचा मानधनाचा कालावधी ३ वर्षावरून १ करण्याबाबत व तिन्ही वीजकंपन्यातील कर्मचारी, अभियंत्यांना शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पेंशनयोजना लागु करा यासाठी बहुसंख्य कामगार, कर्मचारी, अभियंते व अधिकार्यांचे प्रतिनिधित्व करणार्या प्रमुख संघटनांनी महाराष्ट्राच्या वीज उद्योगाच्या अस्तित्वासाठी एक लाख कर्मचान्यांच्या भवितव्यासाठी, ९ जुलैला राज्यव्यापी संप करण्याचा संयुक्त निर्णय घेतला आहे. हा संप शंभर टक्के यशस्वी करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. कृती समितीचे पद अधिकारी श्री. प्रशांत उईके, श्री दिनेश चौधरी, श्री मुकेश वैद्य, श्री जगदीश शेंगर श्री.विलास हिवरकर, नवनीत जयस्वाल,राजेश सर्पा, अभिजित चौहान,पंकज अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. सभेला मोठ्या संख्येत महिलाकर्मचारी, अभियंते व अधिकारीउपस्थित होते.
/तभा तनमेता)