: एक पेड़ माँ के नाम ” या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी येथिल क्रीडा संकुलनात वृक्षारोपण
सडक अर्जुनी= वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी, च्या विद्यमानाने एक पेड मा के नाम अंतर्गत आज दिनांक 06 जुलै रोजी सडक अर्जुनी येथील क्रीडा संकुल च्या भव्य आगारात वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून वृक्षारोपण केले. या प्रसंगी वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला.
विशेष म्हणजे, ‘एक पेड़ माँ के नाम’ या भावनिक संकल्पनेमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. अनेकांनी आपल्या मातेस अर्पण म्हणून वृक्षारोपण केले आणि त्याची जबाबदारी घेतली.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध देशी प्रजातींची झाडे लावली, ज्यात पिंपळ, वड, आंबा, साग, जांभूळ, चिंच आदींचा समावेश होता.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजकुमारजी बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर पोलीस निरीक्षक गणेश वनारे .वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने वन विभागातील संपूर्ण कर्मचारी वनपाल वनरक्षक व पत्रकार बंधू उपस्थित होते